Home

Welcome To 
Savitribai Phule Mahila Mahavidyalaya Jamner-Takali.

अभिनंदन !                                                         अभिनंदन..!                                                         अभिनंदन..!

  • विद्यार्थी मित्रांनो आपण मिळवलेल्या यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणा इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रानो आम्ही स्वागतच करतो.

काळाच्या गरजेनुसार शिक्षण क्षेत्रात सतत बदल होत राहतात, नवनवीन विषयांची निकड लक्षात घेवून संस्थेने SNDT विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठ स्तरावर सुरु असलेल्या विषयापैकी बहुतांश विषय आपल्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात सुरु केले. राष्ट्रीय स्तरावरीत शिक्षण क्षेत्रातील सर्व साधारण गरजा पुर्ण करण्यासाठी व एक सफल व परिपुर्ण नागरिक घडविण्याठी संस्थेचे स्वप्न आहे व ते साकारण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त गुणात्मक शिक्षणासोबत नैतिक व संस्कारक्षम शिक्षणाची तसेच विद्यार्थ्याच्या कलागुणासह सर्वागिण विकासासाठी आमची टीम सदैव तत्पर आहे. आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून सुसंधीचा लाभ घ्यावा, नियमीत वर्गात तासिकांना हजर राहुन आपल्या ज्ञानाचे भंडार समृद्ध करून घेण्यातच खरा आनंद असतो.

अभ्यासक्रम कसा निवडावा

१२ वी नंतर जेंव्हा आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्या समोर प्रश्न निर्माण होतो की, कोणती ज्ञानशाखा निवडावी ? पालकांसमोरही हाच प्रश्न पडतो. ज्यांन शिक्षणाचे उद्दिष्टे स्पष्ट असते, अशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत नाही. पुढे आपल्याला काय व्हायचं, हे निश्चित केले तर विद्याशाखेची निवड सहज करता येते.

जो अभ्यासक्रम आपण निवडणार, तो आपण का शिकला पाहिजे ? तो शिकल्यामुळे आपल्याला नेमका कोणता उपयोग होणार आहे. त्यातून आपणास कोणती नोकरी मिळु शकेल, अथवा कोणता व्यवयाय करता येईल. कोणता आर्थिक फायदा होइल याची माहिती करून घेतली पाहिजे. तसेच आपल्या आवडीचा विषय कोणता आहे. कोणती शाखा आवडते, कोणत्या अभ्यासक्रमात आपण प्रगती करू शकतो किंवा आपल्या मर्यादा काय आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.

अभ्यासक्रमाची निवड करताना आपली बौध्दिक पातळी आवड महत्वाची आहे. पालकाच्या इच्छेमुळे, मित्राच्या आग्रहामुळे किंवा मैत्रिणीच्या सोबतीमुळे आपणास नको असलेल्या अभ्यासक्रमाची निवड करू नये. विद्यार्थ्यांनी स्वतः च्या बौध्दिक पात्रतेनुसार अभ्यासक्रमाची निवड केली तर ते त्यात अधिक प्रगती करू शकतात.